सावधान! फूटपात वरून दुचाकी वाहनेचालवल्यास होणार कारवाई.. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब यांचा इशारा….
ग्रामीण जिल्हा विभागीय सहसंपादक किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती. पुणे

सावधान! फूटपात वरून दुचाकी वाहनेचालवल्यास होणार कारवाई.. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब यांचा इशारा….

बारामती (ॲक्टिव्ह मराठी) (प्रतिनिधी) किरण बोराडे ग्रामीण जिल्हा विभागीय संपादक. दिनांक 13 जानेवारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव याचा यासाठी बारामती शहरात ठिकठिकाणी तर.. अशांवर होणार कठोर कारवाई .! नव्याने तयार करण्यात आलेल्या फुटपाथवरून वाहन चालवल्यास अथवा टुकार गिरी करतअतिवेगाने वाहने चालवल्यास त्या ठिकाणीअसलेल्या सुरक्षा रक्षकांनी तसेच नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांना 9923630652 या क्रमांकावर द्यार्वी अथवा 112 वर कॉल करून याबाबतची माहिती द्यावी. अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल.चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, बारामती दि.१३: वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, अपघातापासून नागरीकांचा बचाव व्हावा, नागरिकांना सुरक्षित चालता यावे. फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथ वरून दुचाकी वाहने चालवण्यात येत आहेत. अशा तक्रारी प्राप्तआहेत, ही बाब चुकीची आणि बेकायदेशीरअसल्याने आता अशा दु्चाकी चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीसनिरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. बारामती शहरातील बेशिस्त वाहतुकीवरआळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक उपाय योजना केल्याआहेत. यामध्ये रस्त्यावर विक्रेत्यां कडून करण्यात आलेली व्यावसायिक अतिक्रमणे, रस्त्यावर अस्ता व्यस्त लावण्यात येतअसलेली वाहने आदींवर कायदेशीर कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना एका रेषेत पार्क करण्यासाठी नायलॉन दोरीचा प्रभावी उपक्रम पोलीस निरीक्षक यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलाआहे. त्यामुळे बारामती शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांनी मोकळा श्वास घेतलाआहे. शहरातील शाळा-महाविद्यालयपरिसरात मोकाट दुचाकी घेऊन टुकार गिरी करणाच्या तसेच फटाका सायलेंसरअसलेल्या दुचाकीवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तुटलेल्या, पुसट झालेल्या, फॅिन्सी व विना क्रमांकाच्या वाहणांवरही वाहतूक पोलिसांकड़्न दंडात्मक कारवाई करून अशा वाहनांवर चक्क सरकारी नियमा प्रमाणे सवलतीच्या दरात नंबर प्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी राबवलेला आहे. असेअसताना आता नव्यान तयार करण्यातआलेल्या फूटपाथवर लक्ष घालून वाहतुक पोलिसांनी स्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे,पुणे जिल्हा ग्रामीण सहसंपादक,किरण बोराडे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती. पुणे.







