Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कडेठाण तालुका दौंड राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती कै.त्रिंबक दिवेकर विद्यालय कडेठाण येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड यांच्यावतीने जनजागृती.

जिल्हा ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज दौंड. पुणे.

0 1 4 7 2 7

कडेठाण तालुका दौंड राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती कै.त्रिंबक दिवेकर विद्यालय कडेठाण येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड यांच्यावतीने जनजागृती.

(ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी. ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर दिनांक. 14 जानेवारी
राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड अध्यक्ष मा. प्रमोद शितोळे व प्रमुख उपस्थितीत श्री नामदेव जठार उपाध्यक्ष श्री शैलेश कदम
यांनी प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले अध्यक्ष प्रमोद शितोळे, मार्गदर्शन करताना म्हणाले
की आदर्श राजमाता कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमाता माँ जिजाऊ यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये तलवारीच्या बळावर दडपशाहीला विरोध करण्याचे धाडस दाखविले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांकडुन ते स्वप्न पुर्णत्वास देखील नेले. माँ.जिजाऊंनी शिवरायांच्या हृदयात स्वराज्य प्रेम रुजविले. हिंदवी स्वराज्याचे महत्व सांगीतले. राजामाता माँ जिजाऊ यांचे कार्य आणि व्यक्तीमत्व महिलांना प्रेरणा देणारे आहे आणी तसेच स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी विचार उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका. स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. स्वतःचा विकास करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. आसे विचार स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठी प्रेरणा देणारे आहे. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश दिवेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले श्री वाबळे सर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित शिक्षक श्री सोनवणे, श्री मोरे, श्री शिंदे, सौ सोनार, सौ गायकवाड, सौ सोनाली दिवेकर सौ इंगळे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी श्री नानासो दिवेकर,शहाजी दिवेकर,भीमराव दिवेकर, अजय गायकवाड, संतोष दिवेकर. जालिंदर दिवेकर दीक्षित काका आदी. उपस्थित होते.ॲक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड.

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे