Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य जपावे,* डॉ सुनील पवार

पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज अँक्टिव्ह मराठी न्यूज.

0 1 4 7 2 7

*शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य जपावे,*
डॉ सुनील पवार
माळेगाव बुद्रुक (प्रतिनिधी) –
शालेय विद्यार्थ्यी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात ,त्यामुळे त्यांच्यात विविध शारीरिक समस्या निर्माण होतात . या समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य जपावे असे उद्गगार डॉ.सुनील पवार यांनी काढले.
माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ पवार बोलत होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या प्रिन्सिपल माऊ घोष व विद्यालयाच्या उपशिक्षिका पौर्णिमा पवार यांनी केले होते. उद्घाटनानंतर प्रमोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगून विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले .शिबिरामध्ये बारामती येथील पवार हॉस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांची रक्तातील साखरेचे प्रमाण ,ब्लड प्रेशर, ईसीजी, थायरॉईड, इत्यादीची विशेष मोफत तपासणी डॉ. अमोल माने, डॉ, स्नेहा जगताप, डॉ .वैभव यादव , यांनी करून औषधोपचार केले.स्त्रीरोग तज्ञ डॉ. ऋचा पवार यांनी विद्यालयातील शिक्षिका व मुलींची तपासणी करून त्यांना विशेष मार्गदर्शन केले. माळेगाव येथील दंतरोग तज्ञ डॉ.रोहन दोषी यांनी विद्यार्थ्यांनी दातांची काळजी व निगा कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करून तपासणी केली. तपासणी वेळी डॉक्टरांना मयूर उंडे,संग्राम जाधव ,साजिद कांबळे, मयूर ढालपे ,पूजा इंगळे यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी होण्याकरिता विद्यालयाच्या उपशिक्षिका पौर्णिमा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षीका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऍक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे