डिगोळ परिसरात तुरीचे उत्पादन घटले एकरी एक ते दिड क्विंटल उत्पादन..शेतकरी अर्थीक संकटात सापडला.
लातूर विभागीय उपसंपदा उपसंपादक बाबुराव बोरोळे.

डिगोळ परिसरात तुरीचे उत्पादन घटले
एकरी एक ते दिड क्विंटल उत्पादन….
शेतकरी अर्थीक संकटात सापडला….

लातूर (प्रतिनिधी) बाबूराव बोरोळे .विभागीय उपसंपादक दिनांक 2 फेब्रुवारी .लातूर
लातूर : डिगोळ सुमठाना परिसरात तुरीच्या राशी हारवेस्टार वरच्या साहाय्याने राशी केल्या जात असून कमी वेळात राशी होत आहेत.
तुरीचे उत्पादन एकरी एक ते दिड क्विंटल होत आहेत तर पाणी दिसलेल्या रानावरील आडीच तीन क्विंटल तुरीचे उत्पादन निघाले आहे. पुर्वी तुर कापणी राशी च्या मशीन नव्हत्या मजूर लावून कापणी गोळा करणे साध्या मळणी यंत्राने राशी केले जात होते राशी करण्यासाठी पाच ते सहा दिवस लागत होते.आता हार्वेस्टर गावोगावी आल्याने तुरीच्या राशी एक दिवसा ऐवजी एका तासात होत असल्याने अळशी पणामुळे शेतकरी सुखावला असून राशी मळणी यंत्रा ऐवजी हार्वेस्टरवर करत आहेत. हार्वेस्टरवर राशी करण्यासाठी एकरी दोन हजार रुपये घेतले जात आहे परंतु एका तासात राशी होत आहेत.मजूदाराचा मजूरीचा भाव वाढला असल्याने मजूर दारांना आलाय भाव पण मजूराने कापणी गोळा करणे राशी करणे मागात पडत असल्याने आता तुरीच्या राशी एका दिवसात हार्वेस्टर वर करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहेत.
डिगोळ परिसरातील जमिनी हलक्या स्वरुपाच्या व माळरान आहेत.गतवर्षी काही शेतकऱ्यांनी माळरान जमिनीवर काळी माती टाकली असून अशा शेतकऱ्यांना थोडे फार उत्पादन वाढले आहे तर काही माळरानावरील शेतकऱ्यांना घातलेला खर्च सुद्धा निघाला
नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
डिगोळ परिसरात सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पाणधुई धुके मुळे तुरीवर पिकावर अळीचा प्रादुर्भाव होवून शेंगा पोखरणाऱ्या अळीने परिपक्व झालेल्या शेंगाना छिद्र पाडून शेंगा सोप केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तूर पिकाला पेरणीपासून लावलेला खर्चही निघाला नसून तुरीच्या पिकाचे उत्पादनाचा उतारा कमी निघाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांनी उदार पादार सावकाराचा आधार घेत औषधी दुकानदारांकडून महागडी औषधे घेवून तुरीच्या पिकावर फवारणी केली परंतु तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या बाजारात तुरीचा भाव. आहे तर सोयाबीनचा सध्या शासनाचा हमी भाव ४९००रुपये आहे. त्या ठिकाणी लाबच्या लांब रागा वहानाच्या लागलेल्या केंद्रावर दिसत आहेत तर बाजारात ४००० आहे त्या ठिकाणी रांगा लागल्या आहेत शेतकऱ्यांच्या पदरी सदा निराशाच आहे.
वाढत्या महागाईमुळे सध्या शेतकऱ्यांना शेती करणे परवड नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी इतर लागवडीचा खर्च जास्त होत आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असल्याने शेतकरी राजा उदास झाला आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. लातूर.







