बारामतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील ९६ कुटुंबीयांना घरकुलाची वाटप .
बारामती (प्रतिनिधी)दि.२२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील रहिवासींना मिळाली हक्कची घरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक बिरजू भैय्या मांढरे, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांचे लाभार्थ्यांनी मानले आभार
बारामती : बारामती शहरातील बहुचर्चित डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील ९६ कुटुंबीयांना घरकुलांचे वाटप करण्यात नगरसेवक बिरजू भैय्या मांढरे यांना यश आले. गेली काही दिवस तांत्रिक बाबींमुळे रखडलेल्या इमारतीच्या लाभधारकांना प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सदर लाभार्थ्यांना सर्वानुमते ठराव करून चाव्यांचे वाटप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर लाभधारकांनी सदर पाच मजली इमारत आहे त्याच जागेवर उभा राहावी. यासाठी स्थानिक नगरसेवक बिरजूभैय्या मांढरे, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी प्रयत्न करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इमारत आहे त्याच जागेवर उभी राहिली. लाभ धारकांना चाव्यांचे वाटप
करून बहुमजली इमारतीतील पक्या घरांचा ताबा
देण्यात आला. यामुळे लाभधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच खासदार सुनेत्रावहिनीसाहेब पवार यांची भेट घेत त्यांचेही आभार लाभधारकांनी व्यक्त केले. बारामती तालुका विभागीय संपादक
किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







