
दक्ष नागरिकांचे लक्ष.
मामा चौकातील सि.सि.टि.व्ही.चा खांब कोसळण्याची शक्यता.

वसमत.( प्रतिनिधी). दिनांक 5 डिसेंबर
वसमत शहरातील विविध ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आबाधीत राहावी व गुन्हेगारावर वचक राहावा या करिता सि.सि. टि.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत .
शहरातील मामा चौकातील ज्या पोलवर हा सर्वांवर लक्ष ठेवणारा कॅमेरा बसवलेला आहे त्याच्या बुडाला गंज लागुन ते कोसळण्याच्या अवस्थेत आहे .दिवसा कोसळला तर चार दोन जीवंत माणसांवर कोसळुन त्यांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे .
म्हणुन प्रशासनाने सदर धोका टाळण्या साठी संबधीता कडुन त्वरीत काम करूण घ्यावे अशी त्या परिसरात वावरणाऱ्या सामान्य जनतेची मागणी आहे . कृपया दखल घेऊन कार्यवाही करावी ही विनंती करण्यात येत आहे . शहरातील अनेक भागात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, ते चालु आहेत अथवा बंद आहेत याची तपासणी करणे सुध्दा आवश्यक आहे. तरी पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आपन सि.सी टि.व्ही च्या नजरेत आहात पण त्याच्या वर दक्ष नागरिक नजर ठेवून आहेत.
ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत, हिंगोली.







