
नगर-प्रतिनिधी दि.६ जुलै. पृथ्वीवरील वाढते प्रदुषण कमी व्हावे.तसेच जिवसृष्टीस शुद्ध हवा व प्राणवायु तथा वेळेवर पावसाचे मुबलक पाणी मिळावे.यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.प्रत्येकाने एक तरी झाड लावावे.असे प्रतिपादन भाजपाचे अनु.जाती मोर्चाचे चिटणीस सुनील सकट यांनी केले आहे. भिंगार रोड,बेल्हेश्वर चौक येथे अहिल्यानगर भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख महेंद्र भैय्या गंधे यांच्या वाढदिवसानिमीत्त भेट वस्तुच्या खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपणाचा सामाजीक उपक्रम राबवविण्यात आला.भाजपा अनु.जाती मोर्चाचे चिटणीस सुनिल सकट व भाजपा कार्यकर्ते अशोक भोसले यांच्या हस्ते कलमी आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी विठ्ठल बोचरे,राजश्री बोचरे, राजेंद्र नागपुरे आदी उपस्थीत होते.नागपुरे व बोचरे परीवारास त्या वृक्षाच्या संवर्धनासाठी पालकत्व देण्यात आले.त्यांनी ते आनंदाने स्विकारले. विभागीय उपसंपादक अमोल भांबरकर. अहिल्यानगर. अहमदनगर.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







