मराठा योद्धा मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार… ..
जालना (प्रतिनिधी) : दि.४.११.२४ आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ महायुतीच्या उमेदवारा विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे भूमिका घेतली आहे. विशेषतः भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे- पाटील सातत्याने टार्गेट करत आले आहेत. भाजप सत्तेत येऊ नये, यासाठी त्यांनी मराठा, मुस्लिम व दलित यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला; पण या प्रयत्नात त्यांना अपेक्षित यश आले नाही. त्यातूनच आता मनोज जरांगे- पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे . मनोज जरांगे -पाटील यांनी काल काही मतदारसंघातील पाठिंबा असलेल्या उमेदवारांची तसेच पाडावयाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती आणि आज याच दोन मुद्द्यांच्या आधारे उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करू ,असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे तसेच सर्वसामान्य जनतेची ही लक्ष लागले होते. परंतु आज सकाळी मनोज जरांगे- पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचा निर्णय जाहीर केला .या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निर्णयाकडे असंख्य उमेदवारांचे लक्ष लागले होते. अंतरवाली सराटी येथे मीडियाशी बोलताना मनोज जरांगे -पाटील यांनी स्पष्ट केले की एका जातीच्या पाठिंबावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. मित्रपक्षांनी मला त्यांच्या उमेदवारांची यादीच सादर केली नाही. परिणामी फक्त निवडणुकीत उभे करावयाच्या व पाडावयाच्या उमेदवारांची आम्ही तयार केलेली यादीच माझ्या हाती राहिली. एकाच जातीच्या पाठिंब्यावर विधानसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही. अर्थात माझा निर्णय ही काही माघार नाही. दबावाखाली घेतलेला निर्णय नाही. हा गनिमा गनिमी कावा आहे. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन सुरूच राहणार आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा बांधवांच्या उमेदवारांनी आपले अर्ज आज मागे घ्यावेत ,असे आवाहन ही मनोज जरांगे -पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याच्या निर्णयामुळे सत्तारूढ महायुतीला विशेषतः भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळणार आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.जालना.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







