

माजलगाव (प्रतिनिधी >किसन पवार) :- माजलगाव येथील पत्रकार संतोष रासवे तथा सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेले संतोष रासवे यांचा वाढदिवस अतिशय प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकी जपत गेवराई येथील बालग्राम अनाथ आश्रमात खाऊ वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आश्रमातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सामान्यतः वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात; मात्र समाजातील गरजू आणि निराधार मुलांसोबत आनंद वाटून घेण्याचा संदेश संतोष रासवे यांनी आपल्या कृतीतून दिला. या उपक्रमामुळे सामाजिक जाणिवा जपण्याचा आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.
या प्रसंगी पत्रकार परमेश्वर सोळंके, बाळासाहेब आडागळे, प्रचंड सोळंके, महादेव आढाव यांच्यासह बालग्राम अनाथ आश्रमातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संतोष रासवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमातून समाजात माणुसकी आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







