बहुजन रयत परिषद च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन*. * मातंग समाजाच्या शेतकरी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या वर कारवाई करा *
अ.नगर(प्रतिनिधी) दि. 14 / सप्टेंबर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर या गावांमध्ये 7 सप्टेंबर 2024 रोजी मातंग समाजाच्या शेतकरी कुटुंबाला गावातीलच शेत शेतीच्या वादावरून संपत गोसावी व गणपत गोसावी व त्याच्या इतर साथीदारांनी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली आहे अक्षरशा स्त्रियांना तर रक्त भांबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे यामध्ये जवळपास सहा रफी सहभागी आहेत ९ सप्टेंबर 2024 रोजी सौ संगीता राधाकिसन लाहुडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करूनही आज अखेर आरोपींना अटक झालेले नाही ही गोष्ट निषेधार्थ असून आरोपीच्या वर कारवाई होण्यासंदर्भात पोलीस प्रसार करून घाई होत आहे त्यामुळे सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच संबंधित शेतकरी मातंग कुटुंबीयांना संरक्षण मिळावे. मातंग समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या फोनवर धनकी देणाऱ्या वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा .व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची निलंबन करण्यात यावी. या मागणीसाठी बहुजन रयत परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बहुजन परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा ना.म. साठे सर, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, जिल्हा सचिव संतोष साळवे ,काशिनाथ सुलाखे पाटील ,एन एम पवळे साहेब, संजय चांदणे, सत्यवान नवगिरे, संजय ताकवले इत्यादी उपस्थित. अँक्टिव्ह मराठी न्यूज.अ.नगर
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







