धनगर आरक्षणासाठी शिंदेंना*
*पूर्ण ताकदीने मदत करणार:*
बारामती प्रतिनिधी: १९
निवृत्त पोलिस अधिकारी
मधोजी शिंदे यांनी धनगर
आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात
जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना
पूर्ण ताकदीने मदत करणार असून,
लोकांना न्याय देण्याची काळजी
घेणार आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते
शरद पवार यांनी शिंदे यांच्या भूमिकेला
पाठिंबा व्यक्त केला.
बारामती येथे शारदा प्रांगणात युवा
नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बोलताना शरद पवार.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती
उत्सव समितीच्यावतीने पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर जयंतीचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी
पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, देशात अनेक
राजे होऊन गेले. मात्र, गेल्या २०० ते
300
वर्षांपासून
सामान्यांच्या
अंतःकरणात ज्यांच्याविषयी आजही
आस्था आहे. त्यांनी सामान्यांचे राज्य
प्रस्थापित केले. छत्रपती शिवाजी
महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले.
हा इतिहास आहे. अहिल्यादेवींच्या
कार्यातून आज ही नव्या पिढीला
आजच्या कार्यक्रमातून मोठी प्रेरणा
मिळेल. देशाच्या स्वातंत्र्याच्या
चळवळीत धनगर समाजाचे मोठे
योगदान आहे. या चळवळीत
बारामतीच्या जगन्नाथ कोकरे
तुरूंगवास भोगल्याचे ज्येष्ठ नेते शरद
पवार यांनी नमूद केले. राजकारणाच्या
सुरुवातीच्या काळात सर्वसामान्य
कुटुंबातील लोक माझ्या मागे उभे
राहिले. पूर्ण शक्ती माझ्या मागे उभा
केली. यात पणदरेचे धुळाबापू कोकरे,
सत्तेचा वापर जनकल्याणासाठी
देशात अनेक कर्तृत्ववान महिला जन्माला आल्या. यामध्ये संकटावर मात
करुन मिळालेली सत्ता रयतेचे राज्य म्हणून चालविण्याचे काम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांच्यावर अनेक संकटे
आली. त्याची चिंता न करता त्यांनी कर्तृत्व, शौर्य दाखविले, मिळालेल्या
सत्तेचा वापर देशातील जनकल्याणासाठी केला. देशाच्या कानाकोपयात
बारव, विहिरी निर्माण करून उपेक्षितांची तहान भागविली.
सर्वसामान्यांच्या हाताला काम देण्यासाठी वस्त्रोद्योग उभारले, याचा आज
अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार
यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला.
विठ्ठलराव कोकरे यांच्यासह अनेकांची
नावे घेता येतील. या लोकांमुळेच देश
आणि राज्याच्या राजकारणात काम
करण्याची संधी मिळाल्याचे पवार
यांनी नमूद केले.
बारामतीत अहिल्यादेवी होळकर
यांचे स्मारक निर्मिती करण्याबाबत
प्रमुख लोकांबरोबर चर्चा करणार
असल्याचे देखील पवार म्हणाले.
आजच्या
कार्यक्रमानिमित्त
अहिल्यादेवींचे स्मरण करताना नवीन
पिढी यशस्वी होईल, यासाठी
प्रयत्नशील राहू, असे पवार म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे
म्हणाल्या, धनगर आरक्षणाबाबत
भाजप नेते राज्यात आणि दिल्लीत
वेगवेगळी भूमिका घेतात. त्यांच्या
मनात असणारी आरक्षणाबाबतची
भूमिका त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे
आहे. स्वतःच्या सोयीचे राजकारण
भाजप नेत्यांनी करू नये, असा टोला
सुळे यांनी लगावला. राज्यात
ऑक्टोबरमध्ये आघाडी सरकार
आल्यानंतर अहिल्यादेवी, जिजाऊ,
सावित्रीबाई या तिन्ही मातांच्या
कर्तृत्वाची भावी पिढीपर्यंत
पोहोचण्यासाठी शिक्षण धोरणात
समावेश करणार. शिक्षणात मनुस्मृती
येऊ देणार नसल्याचा इशारा सुळे
यांनी दिला.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे
वंशज भूषणराजे होळकर यांनी पुढील
वर्षी अहिल्यादेवींची ३००वी जयंती
आहे. या ३००व्या जयंतीनिमित्त
राज्यात अहिल्यादेवींच्या 300
स्मारकांची निर्मिती करण्याची मागणी
केली. त्या स्मारकातून युवा पिढीला
प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उत्तम जानकर, आमदार
संजय जगताप, सक्षणा सलगर, युगेंद्र
पवार यांची भाषणे झाली. यावेळी
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार
गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,
आप्पासाहेब जगदाळे, अॅड. संदीप
गुजर, सत्यव्रत काळे, जगन्नाथ शेवाळे,
शर्मिला पवार, सदाशिव सातव, अॅड.
एस. एन. जगताप, विठ्ठल देवकाते आदी
उपस्थित होते.
*बारामती शहर विभागीय *संपादक:केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती*







