Breaking
ब्रेकिंग

वरवंडच्या पाटबंधारे शाखेचा कारभार खाजगी कर्मचाऱ्याच्या भरवशावर कामकाज सोडून शासकीय अधिकारी गायब?

विभागीय संपादिका दिपाली दिवेकर अँक्टिव्ह मराठी न्यूज.वरवंड.दौंड.क्टिव्ह मराठी न्यूज

0 1 4 7 2 7

वरवंडच्या पाटबंधारे शाखेचा कारभार
खाजगी कर्मचाऱ्याच्या भरवशावर कामकाज सोडून शासकीय अधिकारी गायब?

पाटस (प्रतिनिधी) : विभागीय संपादिका दिपाली दिवेकर. दौंड तालुक्यातील वरवंड येथील खडकवासला पाटबंधारे शाखेत सध्या शाखाधिकारी यांच्यासह कर्मचारीच कामावर येत नसून एका खाजगी व अनधिकृत कर्मचाऱ्याच्या भरवशावर कार्यालयाचा कारभार सुरू आहे.
पुणे पाटबंधारे मंडळाच्या खडकवासला पाटबंधारेची शाखा वरवंड येथे आहे. या शाखेंतर्गत वरवंडसह देऊळगाव, माळवाडी, पडवी, कुसेगाव, कडेठाण, हातवळण इ. आसपासची गावे कार्यक्षेत्रात येतात. या गावांमधील सर्वासामान्य शेतकऱ्यांची, ज्यांच्याकडे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा नाही ते, येथे येऊन पाणीपट्टीचा भरणा करू शकतात. परंतु लांबून आलेल्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरून घ्यायला दप्तर कारकून व शाखाधिकारीच ८/८ दिवस जागेवर नसल्याने शेतकऱ्यांना मुदतीत भरणा करणे अशक्य होत आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना अतिरिक्त दंडासह रक्कम भरावी लागत आहे.
याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर आमच्या प्रतिनिधिंनी प्रत्यक्ष शाखेत जाऊन पाहिले असता खाजगी कर्मचारी व चौकीदार यांच्या व्यतिरिक्त शाखेचा एकही कर्मचारी जागेवर आढळून आला नाही. मुळात कार्यालय उघडण्याची वेळ स. ९:१५ असताना १० वाजेपर्यंत कार्यालय बंदच असल्याचे आढळून आले. शाखाधिकारी यांच्यासह कर्मचारी ८/८ दिवस कामालाच येत नसल्याचे समजले. यावेळी अधिक माहिती घेतली असता येथील कर्मचाऱ्यांनी, इतर शाखेत माणसे कमी असल्याने आम्हाला २/२ शाखेचा अतिरिक्त भार सांभाळावा लागतो, पदानुसार नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त अधिकची कामे करावी लागतात, असे सांगितले.
खरेतर प्रामाणिक कर्मचारी वगळता इतर कामचुकार कर्मचारी याचा गैरफायदा घेऊन कामावर येण्याचे टाळून शासनाचा ‘फुकटचा’ पगार घेताना दिसून येत आहेत. या कर्मचाऱ्यांची दप्तरी ना रोजची हजेरी ना रोजच्या दैनंदिन कामाची कुठल्याही प्रकारची नोंद आहे. येथील शाखाधिकारीच नियमित शाखेत येत नसल्याने कर्मचारी कामचुकार बनले आहेत.
त्यातून कहर म्हणजे एका कथित खाजगी कर्मचाऱ्याच्या, ज्याची दप्तरी कोणतीच नोंद नाही, जो अनधिकृतरित्या कार्यालयात दिवसभर बसतो, त्याच्या हातात महत्वाच्या शासकीय दस्तावेज्यांच्या तिजोरीची किल्ली देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून हा अनागोंदी कारभार सुरू असून देखील वरिष्ठ पातळीवर याची कोणतीच चाचपणी अथवा दखल घेण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याचा प्रामाणिक कर्मचारी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन शाखेत न येणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे