Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भाजपाच्या बड्या नेत्यांकडून सुरेश धस यांची पाठराखण? धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठे वक्तव्य,

विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी मराठी न्यूज. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

*भाजपाच्या बड्या नेत्यांकडून सुरेश धस यांची पाठराखण? धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठे वक्तव्य,*

*अहिल्यानगर प्रतिनिधी: संगीता खिलारी* : 28 डिसेंबर. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता वातावरण चांगलच तापलं आहे.काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता वातावरण चांगलच तापलं आहे.आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा’ अशी मागणी आंदोलकांनी केली, यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अहिल्यानगर दौऱ्यावर असताना बोलत होते.

नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर?

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी म्हटलं की, या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. धस यांनी मुंडेंविरोधात सुपारी घेतली असं त्यांनी म्हटलं होतं. मिटकरी यांच्या या वक्तव्यावर देखील दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घटनेकडे राजकीय अभिवेषातून न पाहाता सुरेश धस यांनी घेतलेली ही भूमिक आहे. कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो त्यामुळे त्यात पक्षीय राजकारण येत नाही. कोणी सुपारी घेतली नाही, किंवा कुणी कोणाला टारगेट केलं नाही असं दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता दरेकर यांनी एक प्रकारे सुरेश धस यांची पाठराखणच केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवरून सर्व राज्यातील सरपंच खतरे में है असं अनुमान लावणं चुकीचं आहे. या पुढे अशा घटना होणार नाहीत, जे जे आरोपी असतील त्यांना ठेचून काढण्याची भुमिका राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत, असंही यावेळी दरेकर यांनी म्हटलं आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे