राहुरी नगरपालिकेकडून राहुरीतील जनतेला नागरी सुविधा मिळत नाही…आर.आर.तनपुरे
उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी अहिल्यानगर

राहुरी नगरपालिकेकडून राहुरीतील जनतेला नागरी सुविधा मिळत नाही…आर.आर.तनपुरे
राहुरी शहर प्रतिनिधी नाना जोशी.दि. 24 डिसेंबर .राहुरी नगरपालिकेच्या हद्दीत पालिका प्रशासनाकडून नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी कुठेतरी कमी पडत असल्याने माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदनाद्वारे तक्रार अर्ज केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा
प्रशासक यांना निवेदन देत संताप व्यक्त केला.सदर निवेदनात म्हटले आहे की, राहुरी शहरात सध्या नागरी सुविधा नगरपालिकेकडून कोणत्याही स्वरूपाची पुर्तता केली जात नाही.शहरात सगळ्या प्रभागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.काही भागात अजूनही मध्यरात्री पहाटे अडीच व पाच वाजता नागरिकांना एवढ्या कडाक्याच्या थंडीत उठून पाणी भरावे लागते.या वेळेला पाणी येते का याची शाश्वती नसते असे जनतेतून बोलले जात आहे.कोणत्याच भागात पाण्याची निश्चित वेळ नसल्याने जनतेमधून संताप व्यक्त होत आहे.तसेच नवीन पाणी योजनेत पुर्वी 90 एचपी पंप ऐवजी 180 एचपी पंप बसून ही पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होत नाही.पुर्वे 90 एचपी पंपाने पाणीपुरवठसाठी अंदाजे तीन लाख लाईट बील येत होते परंतु सध्या लाईट बील अंदाजे आठ लाख रुपये येते तरीही गल्ली-बोळांना दिवसाआड पाणी सोडले जात आहे.मग नवीन 29 कोटीच्या योजनेत दिवसाआड पाणीपुरवठा करणे योग्य आहे का या सर्व बाबी प्रशासकाने दखल घेऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.कचरा उचलणे बाबतीत कारवाई जलद गतीने करावी अन्यथा उपोषण करु असे या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, नारायण धोंगडे, अक्षय तनपुरे, दिनेश उंडे, सत्यवान पासवान, योगेश मुसळे, महेश वारुळे,भाऊ बर्डे आदींच्या सह्या आहेत.यावर नगरपालिका काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.. अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहिल्यानगर.







