अहिल्यानगर मध्ये मातंग समाज पालक विद्यार्थी मेळावा होणार.
अहिल्यानगर मध्ये मातंग समाज पालक विद्यार्थी मेळावा होणार.
अहिल्या नगर (प्रतिनिधी) दि.९ ऑक्टोबर यावर्षी कोल्हापूर सातारा पुण्यानंतर नगरमध्ये पहिल्यांदाच मातंग समाजाचा विद्यार्थी पालक मेळावा. संपन्न होणार आहे. तरी सर्व मातंग समाज बंधु व भगिनींनी उपस्थित राहण्याची सुरेश जगधने यांनी केले आवाहन. सोमवार ,दि. १४/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत , महालक्ष्मी मंदीर परिसर , माळीवाडा , अहिल्यानगर येथे आयोजित केला आहे.
या बाबतची नियोजनपुर्व बैठक माळीवाडा , महालक्ष्मी मंदीराचे पटांगणात नुकतीच पार पडली. याप्रसंगी सर्वश्री – संजय भोंडवे कार्याध्यक्ष, लहानुभाऊ खरात, तालुकाध्यक्ष ,अकोले
बाबासाहेब साठे,शहर अध्यक्ष,
ऊमेशभाऊ साठे, शहर उपाध्यक्ष ,
अहिल्यानगर
बी आर पवार , जिल्हाध्यक्ष,अहिल्यानगर
मच्छिंद्र आरणे ,राहाता तालुकाध्यक्ष
काळुराम बोरुडे, समन्वयक राहाता
गणेश उमाप,जिल्हा. समन्वयक
प्रकाश थोरात , ज्येष्ठ पत्रकार
डेव्हीड औचिते , सामाजिक कार्यकर्ते
तुपसंदर साहेब
इ. मान्यवर ऊपस्थित होते. सदर विद्यार्थी पालक मेळाव्यास , खादी ग्रामोद्योग मंडळ अहिल्यानगर ,गव्हर्मेंट पॅालिटेक्निक
अहिल्यानगर , औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आय. टी आय.) , सहा.आयुक्त सामाजिक न्याय विभाग व बार्टी येथील अधिकारी, प्राध्यापक, व इन्स्ट्रक्टर तथा महाराष्ट्रातून अनेक मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत. तरी इयत्ता ९ वी च्या पुढील ग्रॅज्युएट पदविका पदवीधारक विद्यार्थी व त्यांचे पालकांनी या सुसंधीचा लाभ घ्यावा. व आपला समाज शिक्षित , सशक्त व सुदृढ होण्यास हातभार लावावा. असे जाहीर आवाहन मातंग समाजाच्या वतीने करीत आहे. संपादक उमेश साठे अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर







